महाराष्ट्र

12 ग्रॅम MD सह पती-पत्नी अटक: हुळकेश्वर पोलिसांनी सापळा रचून दोघांना केले गजाआळ

MD सह 6.46 लाखाचा मुद्देमाल जप्त

ऑपरेशन थंडर अंतर्गत शहरभरात पोलिस विभागाकडून अंमली पदर्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात कारवाई होत असतानाही नव-नवे ड्रग्ज पेडलर पुढे येत आहेत. शनिवारी मध्यरात्री हडकेश्वर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर ड्रग्ज विक्रीत सक्रिय पती-पत्नीला सापळा रचून अटक केली. फिरोज खान रफीक खान (30) आणि नाजिया परवीन फिरोज खान (26) रा. बेलदारनगर, टेलीफोन चौक अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपीकडून एमडीसह एकूण 6.46 लाखांचा माल जप्त केला आहे. शनिवारी रात्री 1.10 वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिसांचे पथक ठाण्यांर्गत गस्त घालत होते. या दरम्यान माहिती मिळाली की, पवनपूत्रनगर परिसरात पांढरी कार क्र. एमएच- 40/ए-7261 मध्ये असलेले काही लोक अंमली पदार्थाची विक्री करीत आहेत. माहितीच्याआधारावर पोलिसांनी वाहनाचा शोध सुरू केला. बहादुरा फाटयाजवळील संज्बा ‘ शाळेसमोर पोलिसांनी वरील क्रमांकाची कार अडवली. कारमध्ये फिरोज आणि नाजिया बसलेले होते. त्यांना कारमधून उतखवत झडती घेण्यात आली, मात्र काहीही मिळाले नाही. मात्र माहिती खात्रीशीर होती: पोलसांनी कारची झडती घेतली असता पुढच्या सीटवर नाजियाची ” पर्स ठेवलेली आढळली.

  • पर्स उघडून पहिले असता त्यात 3 झिपलॉक पिशव्यांमध्ये अंमली पदार्थ मिळाले. पोलिसांनी कारमध्येच ठेवलेली दुसरी गुलाबी रंगाची पर्स तपासली

    असता ” त्यात 4 प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे पदार्थ मिळाले. दोन्ही पर्समधून पोलिसांनी 12.01 ग्रॉम मेफेड़ान डग्ज जप्त केले. आरोपींजवळ कारमध्येच ईलेक्ट्रॉनिक वजन काटाही ठेवलेला होता. पोलिसांनी कार आणि ड्रग्जसह एकूण 6.46 लाखांचा माल जप्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button