
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील वेणी गावामध्ये दलीत समाजाच्या स्मशानभूमीसाठी गेल्या वीस वर्षांपासून अडीच एकर जमीन समाजाच्या ताब्यात आहे. ज्याची नोंद ग्रामपंचायतला असल्याचे सांगण्यात येत आहे. समाजाने या जागेवर झेंडा लावून कुंपण केले आहे. मात्र सरपंच, सचिव यांनी याचं जागेतील एक गुंठा जमीन गावातील व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावं, जमिनीवर केलेले कुंपण आणि झेंडा कायम ठेवावा या मागणीसाठी 23 महिलांनी बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला आहे.