महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आरोग्यसेवा थेट नागरिकांच्या दारी

पळसगाव येथे मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विकासासोबतच आरोग्य सेवा गावागावात पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर व शालिनी ताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, वानाडोंगरी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.*

रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी हे शिबिर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय, पळसगाव, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे होणार आहे.तपासणी दरम्यान जे रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरतील, त्यांना नागपूर येथे ने-आण, राहण्याची व औषधोपचाराची मोफत सुविधा देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया शालिनी ताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथे केली जाणार आहे.

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत ३५ हजाराच्यावर मोफत चष्मे वाटप आणि १५ हजारांहून अधिक मोतीबिंदू रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूरचे सचिव राजेश्वर सुरावार यांनी केले आहे.

 

नेत्र शस्त्रक्रियेसाठी ४५० रुग्ण रवाना

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दिनांक ३ मे २०२५ पासून नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात झाली.विसापूर, नांदगाव पोडे, हडस्ती, बामणी, कळमना, जुनोना, कोठारी, चिचपल्ली, अजयपूर, दुर्गापूर, इंदिरानगर, मूल, राजोली, गिलबिली, बोर्डा, सुशी, केळझर, कांतापेठ, चिरोली, चांदसूर्ला आणि पडोली या गावांमध्ये मोफत शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये नेत्र तपासणी करण्यात आली असून, तपासणीनंतर ४५० रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी नागपूरच्या वानाडोंगरीतील रुग्णालयात पाठविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button