आप्पा वॉटर कंपनी जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे सिद्धू कोमजवार यांचा आरोप
देशमुख कंपनी चालविणरे चालक-मालक हितेश घोरडाडेकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

नागपूर : नरसाळा रोड वरील संभाजी नगर येथील देशमुख इंडस्ट्रीज मध्ये आप्पा वॉटर कंपनी जनतेच्या आरोग्याची खेळत असल्या संदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी साहेब, मनपा आयुक्त, व अन्नपुरवठा अप्पर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. नरसाळा रोड संभाजीनगर येथे देशमुख इंडस्ट्रीज म्हणून प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी भरून ते पाणी फिल्टर करून बाहेरच्या काही लोकांना एजन्सी देऊन त्यांना ते पाणी विकल्या जाते व ते त्या प्लास्टिकच्या बॉटल वरती आपले लेबल लावून आपल्या हॉटेलमध्ये किंवा मार्केटमध्ये ते लोक विकतात. त्या पाण्याची क्लॉलिटी अत्यंत घाणेरडी असून त्या पाण्यात मातीचे कण, हिरव्या रंगाचा चिला त्यामध्ये आढळले आहेत. देशमुख कंपनी हि हितेंद्र घोरडाडेकर हे चालतात यांना फोनवरती विचारणा केली असता, त्यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिले. त्या कंपनीमध्ये जाऊन त्यांना फोन करून बोलावल्यानंतर त्यांनी तिथे पण उडवाउडवीची उत्तर दिली. कंपनीचा सर्वे केला असता, कंपनीमध्ये लेबर ला कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. कंपनीमध्ये जागोजागी प्लास्टिकच्या बाटल्या, मोठ मोठ्या पॉलिथिन मध्ये भरून जागोजागी गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले आहे. त्या कंपनीमध्ये फायरची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. भविष्यात चुकीने त्या कंपनीमध्ये काहीही हादसा घडल्यास त्या कंपनीत कोणत्या क्षणी जीवहानी होण्याची भीती आहे. आग लागल्यास एकही लेबर बाहेर येऊ शकणार नाही. अशी त्या कंपनीमध्ये परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही तो कंपनी मालक व ज्यांनी ती कंपनी रेंन्टवरती घेतलेली आहे ते चालवत आहे कंपनीचे चालक हितेश घोरडाडेकरजी हे जनतेच्या आरोग्याची खेळत आहे. अशी तक्रार तीनही मोठ्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिलेली आहे. आज दहा ते बारा दिवस झालेले आहे. त्या कंपनीवर अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे तेथील अधिकारी व कंपनी मालक व कंपनी संचालक यांची साठगाठ असल्याची शंका निर्माण होत आहेत. या कंपनीला लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने ही कंपनी आम्ही बंद पाडू असे आम्ही आज न्यूज पेपरच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना व कंपनी संचालकाला सांगत आहे. यानंतर तिथे काही झाले तर त्याला प्रशासन जबाबदार राहील. महाराष्ट्र शिवसेना माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सिद्धू कोमजवार सोबत दीपक पोहणकर, विनोद शाहू, सागर चरडे, शैलेंद्र आंबीलकर, सचिन काळे, वीर माहेश्वरी, दिपांशु मुंगोले, सुजल शिलांनकर महेंद्र जेठे, यश कोमजवार, शुभम शिंदे,या सर्वांची उपस्थिती होती. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
👆🏾