आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना जानेवारीपासून थकीत असलेले केंद्राचे मानधन त्वरित द्या व ६० वर्ष वयाची वयोमर्यादा रद्द करा
शेकडो आशा वर्कर यांनी केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घेराव

नागपूर – आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयु) तर्फे नियोजन भवन येथे जनसंवाद कार्यक्रमा दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा घेराव करून निवेदन सादर केले. मोठ्या संख्येमध्ये गेलेल्या आशा वर्कर यांच्या सोबत चर्चा करताना पालकमंत्र्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. आबिटकर यांना फोन लावून येत्या गुरुवारी तात्काळ स्वतःच्या दालनात मीटिंग लावून आशा वर्कर यांचे प्रश्न सोडवणे या सूचना दिल्या. सूचना देताना डॉक्टर आबिटकर यांच्याबरोबर चर्चा करतांना कोण स्पीकर मोड मध्ये टाकून राज्याच्या उपाध्यक्ष व नागपूर जिल्ह्याच्या महासचिव प्रीती मेश्राम यांच्यासोबत फोनवर चर्चे दरम्यान अडचणी समजून सांगितल्या.आशा वर्कर यांच्या गंभीर अडचणी प्रीती मेश्राम यांनी आरोग्य मंत्र्यांना समजून सांगितल्या. आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचेवर केंद्र व राज्य सरकारने निर्माण केलेले संकट. आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना जानेवारी २०२५ पासून केंद्राचे कोणतेही मानधन मिळालेले नसुन राज्य किंवा जिल्हा प्रशासन सकारात्मक उत्तर द्यायला तयार नाही. राज्य शासनाचे सुद्धा मानधन मार्च २०२५ पासून थकीत असून त्यावर सुद्धा राज्य शासन तोडगा काढायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आशा वर्कर वर विविध प्रकारचे सर्वे ऑनलाइन करून देण्याच्या दबाव व परिवारावर आलेली उपासमारीची पाळी त्यामध्ये त्या संकटात सापडलेल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचेवर कामाचा ताण देत असून त्या विविध रोगाने ग्रस्त झालेले आहेत. आशा वर्कर वर ऑनलाइन कामाची सक्ती न करता ऑनलाइन कामाकरता डाटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी. दर सहा महिन्याने त्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे असून दर महिन्याच्या एक तारखेला केंद्र व राज्याचे मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होणे गरजेचे आहे.