महाराष्ट्र
अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून रास्तारोको
रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे वाहतुकीची कोंडी:लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोका

अकोला: अकोल्यात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोका आंदोलन केल आहे. तर आज अकोल्यातल्या डाबकी रोड रस्त्याच्या विस्तारकरणाच काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र अजूनही रस्त्याच काम झालं नसल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर या रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे येथे मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे. तर याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आज मनसेने हे रास्ता रोका आंदोलन केल आहे. तर मनसेचे माजी नगरसेवक राजेश काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे.