बच्चू कडू यांना अनिल देशमुखांचा पाठिंबा
शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांसाठी करीत असलेल्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा

अमरावती – शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांसाठी करीत असलेल्या अन्नत्याग आंदोलनास पाठीब्याबात. महोदय,
आपण दि. ८ जुन २०२५ पासुन मोझरी येथे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ, मच्छीमार, नगर पालीका, पंचायत समीती, जिल्हापिरषद, ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करीत आहात. सध्या केंद्रात व राज्यात असलेले भाजपा सरकार हे शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांच्या हिताचे नाही. २०२५ च्या विधानसभा निवडणुक काळात प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आमची सत्ता आली तर शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करुन सातबारा कोरा करु असे जाहिर सभेत आश्वासन देत होते. आज सत्ता येवून ७ महिने झाले तरी आश्वासनाकडे त्यांचे कोणतेही लक्ष नाही. दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधील उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांनी ३१ तारखेपूर्वी सर्व कर्ज व्याजासह भरावे असे सांगत आहे.
भाजपाचे सरकार आल्यापासून शेतमालास योग्य भाव मिळत नाही. ११ वर्षापुर्वी यवतमाळ जिल्हातील दाडी गावात “चाय पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्च व त्यावर ५० टक्के नफा या सुत्रानुसार शेतमालास भाव देवू असे आश्वासन दिले होते. परंतु सरकार येवून ११ वर्ष झाले असले तरी त्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे. राज्यात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार होते आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कापसाला १४ हजार तर सोयाबीनला ८ हजार रुपयापर्यंत भाव मिळाला होता. परंतु आता कापसाला ७ हजार तर सोयाबीनला ४ हजार रुपये भाव मिळत आहे.
जो पर्यत सत्ताधाऱ्यांना याची जाणीव विरोध म्हणुन आपण करून दिली नाही तर त्यांची हुकुमशाही अश्याच पध्दतीने सुरु राहील. शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी, शेतमालास योग्य भाव यासह विविध विषयावर आम्ही सुध्दा सात्यताने आंदोलने करीत आहेत. सरकारच्या विरोधात आपण जे अन्नत्याग आंदोलन करीत आहात या आंदोलनास माझा व माझ्या राष्टवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पुर्णपणे पाठीबा आहे.