देशाचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 26 – देशाचे सरन्यायाधीश माननीय न्या. भूषण गवई उद्या दिनांक 27 जून रोजी नागपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 27 जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन. सायंकाळी सहा वाजता सिव्हिल लाईन्स येथील जिल्हा न्यायालय परिसरात डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन तर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती.
दि. 28 जून रोजी सकाळी 11 वाजता रवी नगर येथील विधी महाविद्यालयात मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण. दुपारी 4.30 वाजता त्यांच्या हस्ते मा. उच्च न्यायालय येथील दुसऱ्या मजल्यावरील बार रूमचे उद्घाटन. सायंकाळी 6.30 वाजता रेशीम बाग येथील सुरेश भट सभागृहात मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हायकोर्ट बार असोसिएशन तर्फे सत्कार समारंभ.
दि. 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता वारंगा बुटीबोरी येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.