महाराष्ट्र ग्रामीण

धक्कादायक: वलगाव उपकेंद्रात तरुणांनी पेट्रोल टाकून जाळले टेबल- खुर्ची

सहाय्यक अभियंत्यालाही जाळण्याचा प्रयत्न:वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तरुण आक्रमक

अमरावती मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या जाणवत आहे. या:वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तरुण आक्रमकमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करून देखील महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून संतप्त झालेल्या दोन तरुणांनी उपकेंद्राच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून टेबल- खुर्ची जाळून टाकली आहे. तसेच सहाय्यक अभियंत्याला देखील जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

 

थोडा वारा किंवा पाऊस आल्यानंतर लागलीच वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. तासंतास वीज खंडित राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरु झाल्याने मागील काही दिवसांपासुन हा त्रास अधिक वाढला आहे. संतप्त नागरिक जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन समस्या मांडतात मात्र याचा काही उपयोग होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. वारंवार होणाऱ्या त्रासाने संतप्त झालेल्या तरुणांनी थेट वलगाव उपकेंद्रात धडक दिली.

 

 

अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रात घुसून दोघांनी तेथील टेबल खुर्चीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच सहाय्यक अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे. आमच्या भागात वीज व्यवस्थित राहत नाही. तुम्ही ऑफिसमध्ये बसून काय करता नियमित वीज पुरवठा का होत नाही? असा सवाल दोघांनी उपस्थित करत थेट कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला.

 

दरम्यान महावितरणच्या उपकेंद्रात जाऊन नुकसान केल्या प्रकरणी दोघा तरुणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सध्या दोघे आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button