महाराष्ट्र ग्रामीण
द्वारका वॉटर पार्कमध्ये बाऊन्सरकडून एका कुटुंबियांना मारहाण:दोन महिला बेशुद्ध
तब्बल दीड तास एका रूममध्ये ठेवण्यात आले कोंबून

ब्रेकिंग न्यूज नागपूर
द्वारका वॉटर पार्क वाकी येथील बाऊन्सर आणि सुरक्षारक्षक यांच्याकडून कामठी येथील एका परिवाराला मारहाण. तब्बल दीड तास एका रूम मध्ये कोंबून ठेवण्यात आले असे सांगण्यात येते मात्र एफ आय आर मध्ये तसा उल्लेख नसल्याचा पोलिसांचा दावा.बेशुद्ध असलेल्या दोन महिलांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटण सावंगी पोलीस चौकी येथे पीडित परिवाराकडून तक्रार देण्यात येत आहे. विशेष म्हणजे खापा पोलीस आणि डायल 112 यांच्याशी संपर्क केल्यावरही त्यांच्याकडून काहीही मदत न मिळाल्यामुळे पीडित परिवाराने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे फोन करून मदत मागितली.. विशेष म्हणजे रेव पार्टी प्रकरण फायरिंग करून हत्या आणि आता द्वारका वॉटर पार्क येथे एका फॅमिलीला मारहाण या प्रकरणामुळे खापा पोलीस स्टेशन सलग तीन दिवसापासून चर्चेत आहे