महाराष्ट्र ग्रामीण
एअर इंडियाचे क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृत्यू झाल्या ची माहिती
अहमदाबाद विमान दुर्घटनेत बदलापुरातील रहिवाशी क्रू पाठक यांचा मृत्यू
कल्याण- गुजरात येथील अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचे विमान क्रैश झाले. यामध्ये दीपक पाठक हे क्रृ मेंबर होते. दीपक हे एक्झिक्युटिव्ह केबिन इन्चार्ज या पदावर होते. दीपक पाठक त्यांचा देखील गुजरात येथील अहमदाबाद मध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांचे आई-वडील घरात आहेत. दोघी बहीण गुजरात साठी रवाना झाल्या आहेत. डीएनए सैंपल देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले आहे. दीपक पाठक अकरा वर्षांपासून एअर इंडिया मध्ये सर्विस करत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर बदलापूर येथील रावळ कॉम्प्लेक्स मध्ये शोककळा पसरला आहे