महाराष्ट्र
एनएमआरडीएच्या क्षेत्रात नाग नदीची स्वच्छता करण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश

नागपूर केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या पिवळी नदी आणि नाग नदीच्या संगमाच्या पुढे नदीची स्वच्छता, खोलीकरण व रुंदीकरण नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) करावे असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज बुधवारी या भागाची पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, सहायक आयुक्त श्री. विजय थुल, कार्यकारी अभियंता श्री. संजय माटे उपस्थित होते.
आयुक्तांनी स्मार्ट सिटी क्षेत्रातील करारेनगर येथील नागनदीवर सुरु असलेल्या पुलाचे बांधकामाचे सुद्धा निरीक्षण केले. या पुलाच्या सुरु असलेल्या बांधकामामुळे पाण्याचा प्रवाह बाधीत होण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी हा अडथळा काढून प्रवाह सुरुळीत करण्याचे निर्देश दिले.