महाराष्ट्र ग्रामीण

गैरहजर असलेल्या ४२ सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई

प्रभाग १६ मधील हजेरी स्टँडची अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्याकडून आकस्मिक पाहणी

नागपूर लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक १६ मधील हजेरी स्टँडला अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी आकस्मिक भेट दिल्यानंतर ४२ कामगार कोणतीही सूचना न देताना गैरहजर असल्याचे आढळून आले. या कामगारांवर १ हजार रुपयांचा ठोठावला असून यापुढे विनासूचना गैरहजर राहणार नसल्याची ताकीद देण्यात आली. अतिरिक्त आयुक्तांनी ४ हजेरी रजिस्टर देखील जप्त केले.

अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्र. १६ येथील हजेरी स्टँडला भेट दिली व हजेरी रजिस्टरची तपासणी केली. यावेळी स्वच्छता निरीक्षक श्री. राजपाल खोब्रागडे हजेरी स्टँडवर हजर होते व श्री. राहुल गजभिये, सुरेश राउत, विनय देशपांडे, परसराम उईके व राकेश गोधारीया यांच्या हजेरी रजिस्टरची तपासणी करतांना हजेरी रजिस्टरप्रमाणे एकूण १२८ कर्मचारी स्वच्छतेच्या कामावर कार्यरत असून कामावर प्रत्यक्ष हजर कर्मचाऱ्यांची

संख्या ८४ होती. परंतु, कोणीतीही सूचना न देता कामावर गैरहजर असलेले ४२ कामगार आढळून आले. गैरहजर राहिलेल्या कामगारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना दिले. यापुढे कोणतीही सूचना न देताना गैरहजार राहणार नसल्याची ताकीद देण्यात यावी,असे निर्देश श्रीमती वसुमना पंत यांनी झोनमधील अधिकाऱ्यांना दिले.

या आकस्मिक पाहणीत २ कर्मचारी रजेवर असल्याचे आढळून आले. हे कर्मचार्यांनी रजा घेण्याची कार्यवाही पूर्ण केली होती काय, याची तपासणी संबंधित अधिकार्यांनी करावी, असेही निर्देश श्रीमती पंत यांनी दिले. यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्याची माहिती उपायुक्त श्री. राजेश भगत यांनी दिली.उपरोक्त प्रमाणे नमुद बाबींची तपासणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button