ग्लोबललॉजिकचे नागपूरमध्ये ‘स्टेम इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन – 400 हून अधिक विद्यार्थ्यांना भविष्यकालीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

नागपूर : – डिजिटलक प्रॉडक्ट इंजिनिअरिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी ग्लोबललॉजिक, जी हिताची समूहाचा भाग आहे, हिने नागपूरच्या सी. पी. बेरार हायस्कूलमध्ये ‘रोबो शिक्षण केंद्र’ या नावाने अत्याधुनिक स्टेम इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन केले.
ही लॅब इंडिया स्टेम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ग्लोबललॉजिकच्या #EducateToEmpower या CSR उपक्रमाचा भाग म्हणून उभारण्यात आली आहे.
या लॅबमधून 6वी ते 11वी इयत्तेतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, एआय, इलेक्ट्रॉनिक्स आणि कोडिंग यामध्ये अनुभवाधारित शिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात आले आहे.
ग्लोबललॉजिकचे नागपूरमध्ये कामकाज वाढवण्याचे धोरण असून, आगामी दोन वर्षांत 400 नव्या कर्मचाऱ्यांची भरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या उद्घाटन प्रसंगी रमन सायन्स सेंटरचे क्युरेटर मनोजकुमार पांडा, ग्लोबललॉजिकचे वरिष्ठ अधिकारी अमित काळे, मोनिका वालिया, तसेच इंडिया स्टेम फाउंडेशनचे संस्थापक सुधांशु शर्मा उपस्थित होते.