गोरेवाडातील तलावात बुडून दोघांचा मृत्यू
सतीश देशभ्रतार अनिकेत बडगे..मानवतानगरात शोक

नागपूर : गोरेवाडा तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या
मानवतानगरातील आतेभाऊ व मामेभावाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी ४:३० ते ४:४५ वाजताच्या सुमारास घडली. सतीश रामराज देशभ्रतार (वय १८) आणि अनिकेत धनराज बडगे (१८) दोघे रा. भद्रशीला बुद्धविहाराजवळ, टीव्ही टॉवर, मानवतानगर अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे मानवतानगरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता, रात्री ११ वाजताच्या सुमारास सतीशचा मृतदेह सापडला.
दोघेही युवक नात्याने आतेभाऊ व मामेभाऊ असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांनी दिली. सतीश आणि अनिकेत यांचे मानवतानगरातील मित्र साहिल चौरे (२१), यश उके (१७) आणि कुणाल उके (१३) हे तलावाच्या काठावर फोटो काढत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही मित्र शनिवारी दुपारी गोरेवाडा
मृत्यू बोटीच्या मदतीने शोधमोहीम गिट्टीखदान ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश देशमाने ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी ५:४५ वाजता महापालिकेच्या अग्निशमन विभागाला सूचना दिली. सिव्हिल लाईन्सच्या अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, तलावात बुडालेल्या युवकांचे कुटुंबीय आणि नातेवाईक गोरेवाडा तलाव परिसरात पोहोचले. घटनेची माहिती मिळताच मानवतानगरातील नागरिक तलाव परिसरात पोहोचले.तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तेथे तलावाच्या काठावर साहिल, यश आणि कुणाल फोटो काढत होते. दरम्यान, ४:४५ वाजता सतीश आणि अनिकेतने कपडे काढून तलावाच्या काठावर ठेवले. त्यानंतर दोघेही तलावात पोहण्यासाठी उतरले. काही वेळानंतर दोघांचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांचे मित्र घाबरले. त्यांनी तलाव परिसराच्या बाहेर निघून याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती दिली. काही नागरिकांनी याबाबत गिट्टीखदान पोलिसांना कळविले.