गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावली आहे

अकोला – गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावलीय. विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकत आहे. तर पाचव्या मजल्यावरून धुरामधून वाट काढत स्वत:भोवती ब्लँकेट लपेटून तिने स्वतःचा जीव वाचवला आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथे बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात अकोल्याची मुलगी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. तर या अपघाताच्या वेळी ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले. आणि त्या परिस्थितीतही ऐश्वर्याने धीर न सोडता धुराच्या गर्दीतून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला आहे.
तर ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तर ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती.
तर झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी आली. आणि उठून पाहिलं तर सर्वत्र धुराच धूर होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच तिने स्वतःला कंबळात लपेटलं आणि अंधार व धुराच्या गर्दीतून मार्ग शोधत पाचव्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला. या दरम्यान तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याचे निशाण आले.
घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने लगेच आपल्या वडिलांना अमोल तोष्णीवाल यांना फोन केला.