जागतिक योग दिन कार्यक्रमाला नागपूरकराचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्वेत रंगात रंगले यशवंत स्टेडियम

नागपूरः नियमित योगासनामुळे शरीर आणि मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते, अनेक आजारांना दूर ठेवता येतात याबाबत जनजागृती करणारे ‘करा हो नियमित योगासन’ हे गीत म्हणत शनिवार सकाळी हजारो योगसाधकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. निमित्त होते ते नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिनाचे.
एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित मनपाचा जागतिक योग दिन कार्यक्रम यशवंत स्टेडीयमवर शनिवारी पार पडला. यंदाच्या दशकपूर्ती सोहळ्याला केंद्रीय मंत्री मान. श्री. नितीन गडकरी, आमदार श्री. प्रवीण दटके, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष श्री. संजय सिंग, कमांडंट नवीन राम, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. अनुप खांडे, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, श्री. गणेश राठोड, श्री. राजेश भगत, श्री. विनोद जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, हिंद केसरी श्री. योगेश दोडके, यांच्यासह मनपाचे उपायुक्त, दहाही झोनचे सहाय्यक आयुक्त इतर कर्मचारी शहरातील विविध योगाभ्यासी मंडळचे स्वयंसेवक व हजारोंच्या संख्येत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.