महाराष्ट्र ग्रामीण
केस गळती, नख गळती अन आता हाताला भेगा:नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील प्रकार

बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्या साठी हे वर्ष धोक्याच ठरताना दिसत आहे अचानकपणे केस गळणे, टक्कल पडणे आणि बोटांची नखे गळून जाणे अशा गूढ आजारांचा अनुभव बुलढाणा जिल्यातील नागरिकांनी घेतला आहे. खामगाव व शेगाव तालुक्यांमध्ये सुरू झालेला हा आजार आता चिखली व मेहकरसारख्या घाटमाथ्याच्या भागातही पसरला आहे. या प्रकारांत अजूनही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचा अहवाल लालफीतशाहीत अडकलेला आहे. त्यातच आता मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख गावातील 20 गावकऱ्यांनी हाताला खोल भेगा पडत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे नोंदवल्या आहेत.