महाराष्ट्र
कल्पना नगर गार्डन पावर ग्रीड परिसरात योग दिन साजरा
मोठया संख्येत योग प्रेमी यांची उपस्थिती

नागपूर – जागतिक योग दिना निमित्त उत्तर नागपूर परिसरातील पावर ग्रीड कल्पना नगर गार्डन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळसे योग प्रशिक्षण देणारे विनोद अंबादे सरांनी उपस्थित लोकांना योग प्रशिक्षण दिले.आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती शारीरिक व मानसिक रित्या झुंजत आहे पण योग अभ्यासामुळे आपल्या शरीराला व मनाला मदत होते व आपण निरोगी राहतो असे आपले विचार व्यक्त करून आज तिथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.या वेळस प्रीती प्रवीण बोदेले (उत्तर नागपूर महिला विंग अध्यक्ष, बहुजन समाज पार्टी) यांनी तिथे भेट दिली व योग प्रशिक्षण देणारे माननीय विनोद अंबादे सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या स्वागत केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्यते योगा प्रेमी यांचा सहभाग राहिला.