महाराष्ट्र ग्रामीण

कूलर बनला काळ : शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

अचलपूर येथील चमक बुद्रुक येथे हृदयद्रावक घटना*

अमरावती जिल्हा

अचलपुर तालुक्यातील चमक बुदुक गावात शनिवारी रात्री उशिरा कूलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमती लक्ष्मण कासदेकर

(३५), श्वेता लक्ष्मण कासदेकर (४ वर्ष) व विकी लक्ष्मण कासदेकर (३ वर्ष, तिन्ही रा. चमक बुद्रुक, अचलपूर) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना परतवाडा परिसरातील वर्तुळात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.

चमक बुद्रुक येथील रहिवासी लक्ष्मण कासदेकर हे शेती कामे करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. रविवारी (दि. १४) रोजी लक्ष्मण कासदकर हे शेतात कामावर होते, तर घरी त्यांची पत्नी सुमती, मुलगा विकी व मुलगी

**शेतातून आलेल्या लक्ष्मण चे सर्वस्व संपले*

*परंतू सायंकाळनंतर शेती कामे आटोपून लक्ष्मण घरी परतल्यानंतर, त्यांना पत्नीसह दोन्ही मुले गतप्राण झालेल्या अवस्थेत दिसून आले. आपले सर्वस्व नियतीने हिराविल्याच्या* *भावनेने त्यांनी टाहो फोडला. गावकः यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली, सरमसपुरा पोलिसांनी घटनास्थळी* *धाव घेऊन पंचनामा केला व तिनही मृतदेह पोस्टमार्टम साठी रवाना केले. चिमुकल्यांचे कलेवर पाहून अनेकांचे अश्रु थांबत नव्हते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, मृताच्या कुटुंबास मदत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.*
*
*चमक बुद्रुक येथे विद्युत प्रवाहाच्या धछ्‌याने एका महिलेस दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. मृत्यू नेमका कसा झाला, ही घटना कशी घडली, याविषयी तपास सुरु आहे* .

*नीलेश गोपालचावडीकर, ठाणेदार, सरमसपुरा पोलिस ठाणे.*

श्वेता होती. दरम्यानच्या काळात सुमती या कुलरमध्ये पाणी टाकत असताना, त्यांना कुलरमधील विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसला. त्याचवेळी लोखंडी पलगांवर असणाऱ्या त्यांचा मुलगा विकी व

मुलगी श्वेता यांनाही विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. या सर्वांनाच विजेचा जोरदार झटका बसल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना कुणालाच माहिती नव्हती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button