महाराष्ट्र
माजी मंत्री पुरके यांचा मंत्री उईके यांच्यावर गंभीर आरोप
आदिवासी विकास मंत्री उईके यांनी चोरी केली २५ एकर जमीन

यवतमाळ राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक उईके यांनी आदिवासी व्यक्तीची २५ एकर जमीन चोरली. एव्हढेच नाही तर सर्व मंत्र्यांना मोहाची दारू भेट दिली असा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी केला आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या आढावा बैठकीत पुरकेंनी हा आरोप केला. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.