महाराष्ट्र ग्रामीण

मुख्यमंत्री चषक U-15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पहिल्यांदाच नागपुरात

मानकापूर स्टेडियमवर 20 आणि 22 जूनला रंगणार कुस्तीचा थरार

मुख्यमंत्री चषक U-15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पहिल्यांदाच नागपुरात मानकापूर स्टेडियमवर 20 आणि 22 जूनला रंगणार कुस्तीचा थरार

नागपूर भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व नागपूर शहर कुस्तीगीर संघ यांच्या सहकापनि आयोजित नागपूर शहरात मुख्यमंत्री चषक 15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे 20 आणि 22 जून 2025 या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकूल मानकापूर येथील इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पटेल विशेष माणजे नागपुरात पहिल्यांदाच राष्ट्रीय मुख्यमंत्री चषक 0-15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे

स्पर्धेच्या उद्‌घाटनाला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष श्री. संजय कुमार सिंह पांची विशेष उपस्थिती असेल. 20 जून रोजी खेळाडूची रिपोर्टीग व पानंतर 21 जून रोजी सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. यानंतर स्पर्धेचा उद्‌घाटनीय सामना खेळविला जाईत 22 जून रोजी सायंकाळी 7 वाजता बक्षीस समारंभ पार पडेल तसेच मा मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजीतदादा पवार, मा. क्रीडा मंत्री श्री. दत्तात्रयजी भरणे, मा पालकमंत्री श्री. वंद्रशेखरजी बावनकुळे स्पर्धेला भेट देतील

मुख्यमंत्री चषक 0-15 राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा फ्रीस्टाईल कुस्ती 38, 41, 44, 48, 52, 57, 62, 68, 75 व 85 किलों या वजन गटात, ग्रीकोरोमन कुस्ती 38, 41, 44, 48, 52, 57, 62, 68, 75 व 85 किलो या वजनगटात तसेच 15 वर्षाखालील मुलींची स्पर्धा 33, 36, 39, 42, 46, 50, 54, 58, 62 व 66 किलो या वजनगटात होणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाशी संलग्न असलेल्या 25 राज्य असोसिएशनचे फ्रीस्टाईल, ग्रिकोरोमन व महिला विभाग अशा 3 प्रकारामाध्ये साधारण 750 कुस्तीगीर, 70 ते 75 कुस्ती मार्गदर्शक व 75 संघ व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होत आहेत स्पर्धेतील विजेता संघ 5 ते 13 जुलै दरम्यान किरकिस्तान येथे होणा-या आशियाई स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची निवड चाचणी होत असून निवड चाचणी संदर्भातील अधिक माहीतीसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके (9850212825) यांच्याशी संपर्क साधावा

महाराष्ट्रात विषेशतः नागपुर मध्ये होत असलेल्या या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेने महाराष्ट्रातील कुस्तीगीर व कुस्ती शौकीनाना प्रोत्साहन मिळणार आहे, 15 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्तीचा धरार अनुभवण्याकरिता सर्व कुस्तीपटू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री. रामदास तडस, नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री चषक 0-15 राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन समिती अध्यक्ष आमदार श्री. संदीप जोशी, सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, कार्याध्यक्ष संजय तिरधकर, उपाध्यक्ष दयाराम भोतमांगे, सहसचिव संदीप खरे, रामा पंगट, रमेश खाडे, पदाधिकारी अविनाश लोखंडे, विनोद कन्हेरे, सतीश वडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button