महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
मुसळधार पावसामुळे पेनटाकळी प्रकल्पाचा कॅनॉल फुटला
20 ते 25 एकर शेत जमीन खरडून गेली

बुलढाणा:- मेहकर व लोणार तालुक्यात २५ जूनच्या सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला की नदी झाले एक झाले. नुकत्याच पेरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. शेतात कमरेपर्यंत पाणी साचले. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाचा 1 ते 11 किमी मधील कालवा फुटल्याने सावत्रा निकस येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जवळपास 20 ते 25 एकर जमिनी पूर्णपणे खरडून गेली आहे. पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा काल झालेल्या पावसामुळे ओसंडून गेला. 1 ते 11 किमी मधील पाचल्याकडे जाणारे आउटलेट पाटबंधारे विभागाने बंद केलेले होते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. कालवा ओव्हर फ्लो झाल्याने सोनार गव्हाण शिवारात कालव्याची मातीची भिंत फुटली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले.