नागपूर पोलिसांची मोठी कामगिरी;सराईत आंतरराज्यीय बाईकचोर अटक
आरोपी कडून ३१ मोटरसायकल जप्त;आरोपीवर ४० गुन्हे दाखल

नागपूर
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये वाहन चोरीचा धडाका लावलेल्या अट्टल चोरांला नागपूर क्राईम ब्रांच युनिट १ च्या पथकांनी जेरबंद केलंय. पोलिसांनी या प्रकरणी कुख्यात मोटर सायकल चोर व त्याच्या भावाला अटक केली. महत्वाचं म्हणजे या चोरट्यांनी आपली चोरी पकडली जात नसल्याचं लक्षात घेऊन चोरीचा सपाटाच लावला. मात्र, चोरीच्या एकसारख्या घटनांचा माग काढत अखेर नागपूर पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यानी चोरलेल्या ३१ बाइक जप्त केल्या
नागपूरात वाहन चोरी होण्याचं प्रमाण वाढल्याने पोलिसांनी या घटनांवर लक्ष केंद्रित केलं. पोलीस समांतर तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली कि एक सराईत आरोपी आहे त्याच्यावर वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहे तो MP नागपुरा व आजूबाजूच्या शहरात चोरी करतो व MP ला नेऊन ते वाहन विक्री करतो अशी गोपनीय माहिती मिळाली होती
पोलिसांनी या माहीच्या आधारे सखोल तपास करून आरोपवर लक्ष करून त्याला ताब्यात घेतलं व त्याच्या कडे तांत्रिक दृष्ट्या तपास केला असता त्याने वाहन चोरी केल्याच कबुल केल. आरोपी नागपुरातील वाहन MP मध्ये नेऊन विकायचा त्याचप्रमाणे पध्यप्रदेशातील वाहन महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विक्री करायचा आरोपी राहुल सूकचंद्र ठाकरे सातनेर तालुका आठणेर जिल्हा बैतुल येथील आहे. ताच्या सोबत ताच्या भावाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
आरोपी हे आठवडी बाजारात जाऊन शाईन आणि स्पेलण्डर या दोनच गाडयांना लक्ष करत होते. आरोपीकडून ऐकून ३१ मोटरसायकल जप्त केले आहे तर आरोपीवर ऐकून ४० गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आरोपीवर नागपुरातील वागवेगड्या ९ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे देखील दाखल आहेत