नागपूर पोलिसांची मोठी कारवाई: युनिट ३ ने लकडगंज जबरी चोरीचा पर्दाफाश केला
दोन आरोपी अटक:1.06 हजारचा माल जप्त

नागपूर – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात युनिट ३ च्या पोलिस पथकाला मोठे यश मिळाले आहे. लकडगंज पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हिमांशू नामदेव चिंचुडकर (वय 25, रा. कळमना) आणि फैजान अन्वर शेख (वय 24, रा. लकडगंज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एक अॅक्टिवा गाडी आणि ६,००० रुपयांची रोकड असा १ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
युनिट ३ च्या तत्परता आणि अचूक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघाचे कौतुक केले आहे.