महाराष्ट्र

नागपूरात दीड वर्षात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त, पोलीस आयुक्तांची माहिती

९४ प्रकरणांत ६ कोटी ८१ लाख रुपये किमतीची एमडी पावडर जप्त

नागपूर: गेल्या दीड वर्षांत नागपूर शहरात आठ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची जप्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिली. ‘ऑपरेशन थंडर’ या विशेष मोहिमेत ७३० जणांना अटक करण्यात आली असून, ५४० प्रकरणांमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक संबंधित गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

नागपूर शहर ड्रग्ज फ्री करण्याच्या उद्देशाने २० ते २६ जूनदरम्यान ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने हा सप्ताह राबविण्यात येणार असून, एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया’या घोषवाक्याखाली शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध खेळांचे खेळाडू यांच्या सहभागातून जनजागृती होणार आहे.

या अभियानादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या एक वर्षात सुमारे ८ कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button