महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपूरमध्ये स्मार्ट मीटरविरुद्ध निषेध; VRAS कडून प्रीपेड मीटरची होळी
विदर्भात स्मार्ट मीटरवरून गोंधळ;रास्ता रोको करण्याचा प्रयत्न

नागपूर:
नागपूर: – विदर्भात स्मार्ट प्रीपेड मीटर जबरदस्तीने बसवल्याबद्दल जनतेचा रोष वाढत आहे. सोमवार, ३० जून रोजी दुपारी १२ वाजता नागपूरमधील व्हेरायटी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समिती (VRAS) च्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यात आली. यावेळी दिल्लीत वीज स्वस्त विदर्भात जनता प्रीपेड मीटरने त्रस्त असं बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून स्मार्ट प्रीपेड मीटरची व्हेरायटी चौकात होळी जाळण्यात आली दरम्यान काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेत त्यांचा हा प्रयत्न हाणून लावला