नागपुरारांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यामध्ये पुढील ५ दिवस आकाश ढगाळ राहणार
तर २५ जून ते ०१ जुलै २०२५ दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता

नागपुरारांसाठी आनंदाची बातमी, हवामानात बदल झाल्याने आता नागपूरकर उन्याच्या चटक्या पासून बचावणार आहेत.
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या मूल्यवर्धित अंदाजानुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये, पुढील ५ दिवस दिनांक २० ते २४ जून २०२५ दरम्यान आकाश आंशिक ते मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता,
दिनांक २१, २२ व २३ जून २०२५ रोजी तुरळक (एक/दोन) ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता,
दिनांक २० व २४ जून २०२५ रोजी काही ठिकाणी (विखुरलेल्या स्वरूपाचा) हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भामध्ये विस्तारित स्वरूपाच्या अंदाज प्रणालीनुसार दिनांक २५ जून ते ०१ जुलै २०२५ दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची, कमाल तापमान मध्यमतः सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी पेक्षा राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
सद्य स्थितीमध्ये नागपूर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने व पुढील ५ दिवस सार्वत्रिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता नसल्याने, अपुऱ्या पावसामुळे जमिनीतील ओलावा कमी असल्याने खरीप पिकाची (सोयाबीन, तूर, उडीद, मुग, तूर इत्यादी) पेरणी टाळावी; पेरणीसाठी पुरेसा व बियाण्यांची उगवण होण्यासाठी पुरेसा पाऊस पडेपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला जात आहे.