
नागपूर –
मागील काही दिवसापासून नागपुरात पोलिसांनी धुमाकूळ घातला असून चोरांना कायद्याची भीती नसल्याच चित्र स्पष्ट दिसत आहे. एका मागून एक चोरीचे विडिओ व्हायरल होत आहे
दरम्यान बाजीराव गल्ली येथे चोरांचा सूळसुळाट पाहायला मिळाला असून नागपुरात चोर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यादरम्यान पोलीस ठाणे तहसील हद्दीतील बाजीराव गल्ली मध्ये चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. येथील काही दुकानात घुसून चोरटे चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वायरल झाले आहे. येथून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती उघडकीस येत आहे. दरम्यान पुन्हा एकदा पोलीस सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.