
नागपूर : महाल गांधीगेट परिसरातील जयकमल
कॉम्प्लेक्सला शनिवारी गिरीश खत्री,
मृत सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. गिरीश खत्री (वय ३५) व विठ्ठल धोडे (२५) अशी मृतांची नावे आहेत. यात गुणवंत नागपूरकर (४५) व ऐश्वर्या त्रिवेदी हे जखमी झाले आहेत.
शासकीय वैद्यकीय त्यांच्यावर महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत असून, अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
जयकमल कॉम्प्लेक्स हे व्यावसायिक आणि रहिवासी कॉम्प्लेक्स आहे. येथे ४० फ्लॅट व जवळपास ३० दुकाने आहेत. येथे एम. के. लाईट हाऊस नावाचे गिरीश मुरलीधर खत्री यांचे दुकान आहे. याच इमारतीच्या पहिल्या माळ्यावर खत्री यांचे गोडाऊन आहे. या गोडाऊनच्या वरच खत्री हे वास्तव्याला देखील होते. गोदामात लग्न व इतर समारंभात सजावटीचे साहित्य ठेवले होते. यात कोल्ड फायर पायरो, विद्युत दिव्यांच्या माळा, हॅलोजन लाईट व इतर विद्युत साहित्य ठेवले होते. शनिवारी गोदामामध्ये वेल्डिंगचे काम सुरू त्याच दरम्यान आग लागली त्यात दोघांचा मृत्यू झाला