महाराष्ट्र ग्रामीण

Nilesh Rane : “निलेशजी तुम्ही tax free आहात,” नितेश राणेंच्या रिप्लायनंतर निलेश राणेंकडून पोस्ट डिलीट

Nilesh Rane : निलेश राणे यांनी त्यांचे बंधू आणि मंत्री नितेश राणे यांना सल्ला देणारी सोशल मीडिया पोस्ट डिलीट केली आहे. या पोस्टची जोरदार चर्चा सुरु होती.

मुंबई :  शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी त्यांचे बंधू मंत्री नितेश राणे यांना सल्ला देणारी पोस्ट डिलीट केली आहे. नितेश राणे यांनी निलेश राणे यांच्या पोस्टला रिप्लाय देखील दिला होता. या दोन्ही पोस्टची चर्चा पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर निलेश राणे यांनी अखेर त्यांची पोस्ट डिलीट केली आहे.

शिवसेना आमदार निलेश राणेंकडून नितेश राणेंना सल्ला देणारी ती पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. मंत्री नितेश राणेंना सल्ला देणारी निलेश राणेंची पोस्ट डिलीट झाली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत नितेश राणेंनी जाहीर सभेत एक वक्तव्य केलं होतं. निलेश राणेंनी त्या वक्तव्यानंतर मंत्री नितेश राणेंना एक सल्ला दिला होता. मंत्री नितेश राणेंनी या पोस्टवर मिश्किल प्रतिक्रिया दिली होती. नितेश राणेंच्या मिश्किल प्रतिक्रियेनंतर निलेश राणेंकडून पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.

निलेश राणेंच्या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

नितेश ने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे.

सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे.

आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.

निलेश राणे यांनी ही पोस्ट केल्यानंतर नितेश राणे यांनी त्याच्यावर मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. निलेशजी तुम्ही tax free आहात, असा रिप्लाय नितेश राणे यांनी दिला होता.

राणे बंधू महायुतीत पण वेगळ्या पक्षात 

नितेश राणे आणि नारायण राणे भाजपमध्ये आहेत. तर, निलेश राणे शिवसेनेत आहेत.  नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आहेत. तर, नितेश राणे कणकवलीचे आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. ते भाजपची भूमिका आक्रमक पणे मांडत आहेत. तर, निलेश राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. निलेश राणे सध्या शिवसेनेत आहेत.

ज्यामुळं निलेश राणेंनी सल्ला दिला त्याचं कारण काय?

सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिली आहे. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते.  नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर निलेश राणे यांनी सल्ला दिला होता. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्हा नियोजन समितीमधील निर्णयांवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button