निवृत्त अंमलदाराचा सत्कार:खंडाळा १९९४ बॅचचे अंमलदार सुनील मस्के यांचे नागपुरात जोरदार स्वागत

नागपूर : –खंडाळा १९९४ बॅचचे वरिष्ठ अंमलदार सुनील मस्के यांच्या निवृत्तीनिमित्त नागपूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात एका भावनिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. समारंभात, पोलिस विभागातील अनेक अधिकारी आणि सहकारी उपस्थित होते, ज्यांनी मस्के यांच्या कार्यकाळाचे कौतुक केले आणि त्यांच्या शिस्तबद्ध, निष्ठावान आणि प्रेरणादायी सेवेचे स्मरण केले. सत्कार समारंभास संतोष गिरी, संजय बागडकर, प्रकाश नागपुरे, बबलू बागडे, अजय बैस, तेजराम देवळे, विनोद साखरे, विजय हरणे, राजेश गिरडकर, उपेंद्र तायडे, राजेंद्र वासाडे, दिनेश बावनकर, सचिन वासाडे, प्रमोद बावनकर आदींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे वातावरण आत्मीयतेने भरलेले होते आणि सर्वांनी श्री. मस्के यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.