महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

न्यूटनचा सिद्धांत, विविध खेळामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर

मनपा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन घडविण्यासाठी मनपाचा उपक्रम

 

नागपूर : नागपूर महानगरपालिकेने एचसीएल फाऊंडेशन आणि एसईडीटी यांच्या सहकार्याने रामदासपेठेतील हिंदी मोर शाळेत यंग कलाम डिस्कव्हरी सायंस सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या विज्ञान केंद्रात ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध शाखांबद्दल माहिती दिली जाते व त्यातून मिळालेल्या ज्ञानावर आधारित वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन त्यांची चाचणी घेतली जाते. यातून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व विज्ञान दृष्टीकोन दृढ होण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे, केंद्राच्या उभारणीसाठी एचसीएल फाऊंडेशन द्वारे अर्थसहाय्य केले जात असून, सोशल इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्टची ही संकल्पना आहे.

विज्ञान क्षेत्रात झालेले बदल आणि विज्ञानाची अनोखी दुनियेचे दर्शन घडविणारी सफर यंग कलाम डिस्कवरी सायंस सेंटरमध्ये घडविली जाते. नवे प्रयोग दाखविणारी डिस्कवरी सायंस सेंटर विद्यार्थ्यांना विज्ञानाची अधिक भुरळ घालते. त्याचबरोबर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासह वैज्ञानिक घडविण्यास मोठा हातभार लावला आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. नुकतेच या केंद्राला आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देत कार्याचे कौतुक केले होते

एचसीएल फाऊंडेशनच्या परभणी येथील केरवाडी केंद्रातील विज्ञान प्रयोग आणि साहित्य नागपूरच्या या केंद्रात आणण्यात आले आहे. मनपा आणि एचसीएल यांच्यात २०१७ पासूनच या केंद्राच्या माध्यमातून मनपा शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची वाढवण्यावर आणि त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या जागरूक करण्यावर काम केले जात आहे. पूर्वी हे केंद्र इतवारी येथील लालगंजमध्ये होते, जे २०१९ मध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे विद्यानिकेतन, रामदासपेठ येथे हलवण्यात आले. मनपाने या केंद्रासाठी तीन वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यांचे प्रयोगशाळेत रूपांतर करण्यात आले आहे.

यंग कलाम डिस्कवरी सायंस सेंटरच्या तीनही प्रयोगशाळेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिक शास्त्रातील,खगोलशास्त्र व इतर शास्त्राचे विविध प्रयोगाचे अदभूत दर्शन होते. विद्यार्थ्यांमध्ये कुतहूल निर्माण व्हावी याकरीता विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी मिळते. मनपाच्या शाळेतील पाचवी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या केंद्रात आल्यावर त्यांची अर्धा तासात 30 गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाते. त्यानंतर परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सांगितले जाते. पुढे तीनही लॅबमध्ये विद्यार्थ्यांना केंद्रातील फॅसिलेटर निखिल लक्षणे आणि कालीदास नाकाडे व इतर सहकारी यांच्यामार्फत माहिती दिली जाते. प्रत्येक विज्ञान प्रयोगाची सविस्तर माहिती दिली जात असल्याने वर्गात शिकलेल्यापेक्षा विद्यार्थ्यांना कृतीतून अधिक माहिती मिळते. सोशल इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजिंक्य कुळकर्णी आणि एचसीएल फाऊंडेशन व्यवस्थापक श्री. पियुष वानखेडे यांच्या देखरेखीत उत्तम कार्य केले जात आहे.

शाळेतही आपण हेच शिकलो पण प्रत्यक्ष कृतीतून आणि नजरेखालून प्रयोग गेल्याने विद्यार्थ्यांचा आनंदही द्विगुणित होत असतो. तसेच केंद्रातही विविध प्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, हुशारीची परीक्षा या प्रयोगातून घेतली जाते. यामुळे नवे ज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानाविषयी ज्ञानाच्या कक्षा रुदांवण्यास मोठी मदत होत आहे. केंद्रात आल्यानंतर आणि प्रयोगशाळा पूर्णपणे पाहिल्यानंतर तीन तासानंतर विद्यार्थ्यांची दुसऱ्यांदा वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाते. यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये मोठी वाढ होत असल्याचे केंद्राचे फॅसिलेटर श्री. निखील लक्षणे यांनी सांगितले. विज्ञानाचे विविध प्रयोग प्रत्यक्ष पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारतो. पुढे सायन्स फेस्टीवलमध्ये विद्यार्थ्यांकडून मॉडेल तयार केले जाते. अनेकदा इन्सपायर अवार्ड सुद्धा विद्यार्थ्यांनी जिंकले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button