प्रभाग २६ मधील विविध समस्यांचा ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी घेतला आढावा

नागपूर. नागपूर महानगरपालिकेच्या नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २६ मधील विविध समस्यांचा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ॲड. मेश्राम यांनी मनपाच्या अधिका-यांची चर्चा करून जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधले.
प्रभाग २६ मध्ये घरगुती वीजेची तक्रार तसेच अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्याबाबत तक्रार ॲड. मेश्राम यांच्याकडे प्राप्त झाली. त्यांनी याबाबत आढावा घेतला. प्रभाग क्र २६ येथील घरगुती वीजेच्या तक्रारी संदर्भात महावितरण अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता नागरिकांची संयुक्त बैठक त्यांनी घेतली. याशिवाय नादुरूस्त पथदिवे तात्काळ दुरुस्त करावे व आवश्यक त्या ठिकाणी नवे लाइट्स लावून सेवा पूर्ववत सुरु करण्याबाबत त्यांनी विद्युत विभागाला सूचना केली.
बैठकीला महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, श्री. प्रकाश रुद्रकार, कार्यकारी अभियंता श्री टेकाडे, उभियंता श्री बारापात्रे, अभियंता श्री माहाडिक, सहाय्यक अभियंता श्री. अशोक भोतमांगे, भाजपा प्रभाग अध्यक्ष श्री. सुरेश बारई, श्री. अशोक देशमुख, श्री. सुनील आग्रे, श्री. रवी धांडे, श्री. रामचरण बेनिया, कल्पना सर्वे, सिंधू परातें उपस्थित होते.