प्रसूतीनंतर मृत्यू… GMC नागपूरमधील दुर्लक्षाने उडाली खळबळ!
शौचालयात पाय घसरून प्रसूतिदार महिलेचा मृत्यू, GMC प्रशासनावर गंभीर आरोप!

नागपूर
चौकशीची मागणी, न्यायाची हाक! GMC मध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू
“पाणी टाका” म्हणणं जीवावर बेतलं! GMC मध्ये रुग्णिणीचा मृत्यू
ड्युटीवरील हलगर्जीपणाचा बळी? GMC मध्ये महिला रुग्णाचा मृत्यू!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) नागपूरच्या प्रसुती गृहातील गंभीर दुर्लक्षामुळे सौ. चंद्रकला संजय रजक (वय ३३) या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३३ मध्ये ४ जून रोजी सकाळी ९:१० वाजता चंद्रकला रजक यांनी बाळास (मुलगा) जन्म दिला होता. सर्व काही सुरळीत असतानाही १७ जून रोजी सकाळी ९:३० वाजता त्या शौचालयात पाणी टाकायला गेल्यानंतर पाय घसरून पाण्याच्या टाकीत पडल्या. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी नगरसेवक मनोज गावंडे, काँग्रेसचे पर्यावरण विभाग अध्यक्ष मनीष चांदेकर यांनी आमदार विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता आणि अधीक्षक यांना निवेदन दिले.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री यांना शिष्टमंडळ भेटणार असल्याचेही सांगण्यात आले.
या वेळी कुटुंबीयांसह काँग्रेसचे सुशील वाहने, सचिन भुजंग, गोलू निर्मलकर, विक्की वर्मा, रोशन तितरमारे, कुणाल हिवसे, राजू कांबळे, एडमंड मार्टिन, रणजीत मेश्राम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.