
रामटेक – जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पवनी जवळील चिंधाई माता मंदिर परिसरात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पवनी वनपरीक्षेत्र हद्दीतील महाराष्ट्र वनविकास महाडल अंतर्गत येत असलेल्या चिंधाई माता मंदिराजवळ महामार्गाच्या कडेला एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. परिसरात दुर्गंधी येत असल्याने काही नागरिकांचा त्याकडे लक्ष गेले.
या संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य पाहता उपवनसंरक्षक श्वेता राठोड व वनपरीक्षेत्र अधिकारी गौरव पाटील यांनी घटनास्थळ गाठले व मृतदेहाचा पंचनामा केला.
बिबट्याच्या मृत्युचे कारण अजूनही अस्पष्ट असून शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मृत्युचे खरं कारण आणि बिबट्याची वय कळेल अशी माहिती उपवनसंरक्षक श्वेता राठोड यांनी सांगितले.