महाराष्ट्र
रवींद्र शेंडे यांची माजी विदर्भ समन्वय समिती सदस्य म्हणून नियुक्ती
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नागपूर महानगरचे अध्यक्ष रवींद्र शेंडे
नागपूर रवी शेंडे हे मागील सात वर्षापासून वंचित बहुजन आघाडी मधे कार्यरत आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून त्यांनी तात्कालीन मुख्यमंत्रीच्या विरोधात निवडणूक लढली होती. आंबेडकरी चळवळीचे आंदोलनकारी नेते म्हणून ते ओळखले जातात. खैरलांजी आंदोलनामधे त्यांचा सिंहाचा वाटा राहलेला आहे. तसेच भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाईच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून शुरू असलेल्या महाबोधि विहार मुक्ति आंदोलनामधे त्यांचा सक्रिय सहभाग राहलेला आहे. आता विदर्भ स्तरावर नियुक्ति झाल्यामुळे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.
जिल्हा प्रभारी कुशल मेश्राम, राजू लोखंडे, विवेक हाडके, प्रफुल माणके, सिध्दांत पाटील, धम्मदीप लोखंडे, इ. पदाधिकाऱ्यांनी रवी शेंडे यांचे अभिनंदन केले.