महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
साईबाबा नगर खरबी नागपूर येथील प्रशासन सुस्त

नागपूर – काल 25 जून बांगडे लेआऊट साईबाबा नगर येथील रहिवाश्यांच्या घरात सर्व रूम मध्ये रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे अंदाजे २ फीट पाणी घुसले . त्या पाण्या सोबत साप, विंचू, आणि इतर जलचर प्राणी आले.
हा भाग बहादुरा नगर पंचायतीच्या हद्दीत असून जानेवारी २५ पासून येथे नाली व सिमेंट रस्ता अंदाजे २०० मीटर अर्धवट बांधून सोडून देण्यात आला. नालीतून पाणी पास व्हायला जागा नसल्यामुळे व अर्धवट झालेल्या नालीला झाकण नसल्यामुळे लोकांच्या घरात नालीचे घाण पाणी शिरले.
व प्रत्येक वस्तूचे व फर्निचर चे नुकसान झाले. आता यावरून जनता त्रस्त आणि प्रशासन सुस्त हेच लक्षात येते. घरात पाणी शिरल्या मुळे सर्व वयस्कर लोकांना पाणी काढावे लागले. ही घटना रात्री ११ वाजता पासून घडली. रात्रभर लोकांना झोपता आले नाही. बागडे लेआऊट साईबाबा नगर येथील त्रस्त नागरिक.