सेकंड फ्लोअर कॅफे’वर पोलिसांची रेड कारवाई:कॅफेच्या आड हुक्का पार्लर
चार आरोपी अटक:३.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर
नागपूरच्या सीताबर्डी भागात असलेल्या ‘सेकंड फ्लोअर कॅफे’वर पोलिसांनी छापा टाकला आणि एका बेकायदेशीर हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत ४ जणांना अटक करण्यात आली आणि घटनास्थळावरून ३.८३ लाख रुपयांचे हुक्काशी संबंधित पदार्थ जसे की फ्लेवर्स, सिलेंडर, पाईप्स आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली. शहरातील बेकायदेशीर हुक्का पार्लर आणि फ्लेवर्ड तंबाखू विक्रीविरुद्ध राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत ही रेड कारवाई करण्यात आली.
लक्ष्मीभवन चौक गौतमारे कॉम्पलेक्सच्या दुसऱ्या माळ्यावर सेकंड फ्लोअर कॅफे आहे.याच कॅफे आड बेकायदेशीर हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 5 ला मिळाली होती.पोलिसांनी माहितीच्या आधारे रेड कारवाई करत हुक्का पार्लरचा भांडफोड केला आहे
या कारवाईत पोलिसांनी हुक्का पॉट १७ नग, हुक्का पॉट मध्ये लागलेली नळ्या, हुक्का पॉटवर लागलेल्या चिलम, हुक्का फ्लेव्हर, अॅन्ड्रॉईड मोबाईल, दुचाकी गाडी य नगदी असा एकूण ३,८३,५८०/-रूपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे तर 1)सन्नी विकास बोरकर वय २५ वर्ष रा. आंबेडकर नगर धरमपेठ नागपूर शहर)हर्ष सुरेश खंडारकर वय २२ वर्षे रा. रामनगर हिलटॉप, नागपूर शहर३) अर्पन रवी जामगडे वय १८ वर्षे रा. हिलटॉप सुदाम नगरी पो. ठाणे अंबाझरी नागपूर४) ब्रिणाल सुधीर गवरे वय २० वर्षे ग. धरमपेठ आंबेडकर नगर नागपूर या चार आरोपीना अटक केली आहे