महाराष्ट्र ग्रामीण
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा-खासदार अमर काळे
अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
- वर्धा – कर्जमाफीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचा खोटारडेपणा एकदा पुन्हा जनतेच्या समोर आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जवळपास 7 ते 8 महिनेच्या वर झाले आहेत, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आलेला आहे, आणि सत्तेवर येण्याआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिला होता. परंतु 7 ते 8 महिने होऊन सुद्धा, शेतकऱ्यांची आत्महत्या होवून सुद्धा अजूनही कर्जमाफीच्या बाबतीत कुठलंही ठोस पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेलं नाही. पुढच्या काळामध्ये तात्काळ भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी करावी, अन्यथा पुढचं आंदोलन हे रस्त्यावर उतरून करू, आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा आम्ही फिरू देणार नसल्याचे खासदार अमर काळे यांनी प्रतिक्रिया देतांना व्यक्त केले