महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
सुप्रिया सुळे शनिवारी नागपूरात

नागपूर, प्रतिनीधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सांसदरत्न खा.सौ. सुप्रियाताई सुळे या एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर शनिवार दि. 28 जुन 2025 ला येत असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.
सकाळी त्या मुंबईवरुन विमानाने नागपूरला येतील. सकाळी 9.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नागपूर शहर व ग्रामिण प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत रवीभवन येथे आगामी स्थानीक संस्थाच्या निवडणुकीबाबत चर्चा करतील. नंतर एका खाजगी कार्यक्रमात उपस्थीत राहतील. दुपारी त्या परत विमाने मुंबईला जाणार असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.