महाराष्ट्र ग्रामीण

सुरेश भोयर यांनी कामठी विधानसभेतील वाढीव मतदारांवर घेतलेले आरोप खोटारडे

मतदारांचा घोर अपमान -

Nagpur ग्रामीण
आनंदराव राउत जिल्हा अध्यक्ष (रामटेक) – मनोहरराव कुंभारे जिल्हा अध्यक्ष (काटोल)
नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत कामठी विधानसभेतील वाढीव मतदानावर काँग्रेस चे सुरेश भोयर यांनी यांनी प्रशासनावर खोटारडे आरोप करून कामठी विधानसभा क्षेत्रातील मतदारांचा घोर अपमान केला आहे. मतदार नोदणीची एक विशिष्ट प्रक्रीया असते. त्या प्रक्रीयेच्या माध्यमातुनच मतदार नोंदणी झाली असतांना अशा प्रकारचे आरोप करणे ही आरोप करणाऱ्याची बौद्धिक दिवाळखोरीच असल्याचे आनंदराव राउत यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. तसेच प्रत्येक आरोपाचे मुद्दे उत्तरही दिले.
आरोप 1: कामठी विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत नियमबाह्यरित्या १५ दिवसात १२ हजार नावे ऑन लाईन पद्धतीने समाविष्ट केली.
उत्तर: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता अंतिम मतदार यादी जरी 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली, तरी निवडणूक आयोगाच्या दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार निवडणूकी करीता उमेदवाराचे नामनिर्देशन स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसाआधी पर्यंतचे अर्ज निकाली काढण्याबाबत निर्देश असल्याने त्यानुसार सदर तारखेपर्यंत प्रलंबीत अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात आली. दिनांक 30/08/2024 पासून ते दिनांक 19/10/2024 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जापैकी निकषानुसार पात्र 12950 अर्ज मंजूर करुन त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे 15 दिवसात हजार नावे समाविष्ट केली, असे म्हणणे अपुऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे.
आरोप 2: लोकसभेच्या पराभवानंतर अवघ्या चारच महिन्यात कामठीत ३५ हजार मतदारांची नोंदी उत्तर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही 19 मार्च 2024 रोजी पार पडली आणि विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी झाली, यामध्ये 7 महिन्याचे अंतर दिसत असतांना 4 महिन्याची गणना विरोधी पक्षाने कोणत्या दिवसापासून केली हे आपण त्यांनाच विचारावे, वास्तविक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता वापरण्यात आलेल्या मतदार यादीनुसार मतदारांची संख्या 466231 एवढी असून सदर निवडणूकीनंतर निवडणूक आयोगाकडून प्राप्त मतदान नोंदणीबाबत कार्यक्रमाच्या अनुषंगाणे कार्यक्रम राबवून कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यास्तव जनजागृतीच्या माध्यमातून मतदार संख्या वाढविण्यात येऊन विधानसभा
निवडणूक 2024 करीता वापरण्यात आलेल्या मतदार यादीनुसार मतदारांची संख्या 501770 असल्याचे दिसून येते. सदर वाढ ही 35539 असून त्याची टक्केवारी 7.08 टक्के असल्याचे निदर्शनास येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button