स्वच्छ आरोग्यदायी आनंदी नागपूर ह्या मोहीमेला सुरवात : प्रदीप देशपांडे
कचरा मुक्त आरोग्यदायी नागपूर हे आमचे ध्येय

नागपूरकरांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष नवीन नाही वारे शेर आ गया शेर हा नारा आजही लोकांच्या लक्षात आहे एकेकाळी विदर्भावरील अन्याय बघता वेगळ्या विदर्भ राज्याची चळवळ पक्षाने चालवली पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे तेव्हा वेगळ्या विदर्भ राज्याच्या आमच्या भूमिकेतही बदल झाला आहे सध्याच्या परिस्थितीत लहान राज्य म्हणजे घोडेबाजाराला चारा देण्यासारखे आहे तेव्हा वेगळ्या विदर्भ राज्याला आमचा सपोर्ट नाही आमच्यासमोर खालील मुद्दे आहेत.
2023 च्या स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरचा 86 वा. क्रमांक लागला कचरा मुक्ततेच्या बाबतीत शून्य मार्क मिळाले म्हणून आम्ही स्वच्छ आरोग्यदायी आनंदी नागपूर ही मोहीम हातात घेतली असून 2025 मध्ये याच सुधारणा होईल हे आम्ही बघू त्याची सुरुवात काचीमेट कमला नगर आदिवासी सोसायटी येथून केली असून त्याला महानगरपालिकेचे तसेच येथील लोकांचे सहकार्य मिळत आहे आमचे श्री महेश मौर्य सिकंदर शेख हा परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहील याची काळजी घेत आहेत दुसरे म्हणजे जे पूल तुटलेत सिमेंटच्या रस्त्यांना भेगा पडल्यात ते तसे होऊ नये यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत आमची भूमिका सहकार्याची आहे गडकरींचे नागनालयाचे ड्रीम प्रोजेक्ट चांगले असून ते पूर्ण होण्यास आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू तसेच संगीत फवारावर देखील योग्य तो तोडगा काढू कुणालाही कुत्रा चावणार नाही याची आम्ही हमी घेऊ महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अंतर बाह्य बदल घडवून आणू अगदी नाममात्र फी ठेवू जेणेकरून ओपन कॅटेगिरी लोकांना शिक्षण घेणे सोपे जाईल आजूबाजूला येत असलेल्या मोठ्या कंपन्यांच्या सहयोगाने तरुणांना प्रशिक्षण देऊ या दोन-तीन मुद्द्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भर देणार आहोत. फक्त दोन किंवा तीन जागा लढण्याचा आमचा विचार आहे.
कारण कचरा मुक्त आरोग्यदायी नागपूर हे आमचे ध्येय आहे. त्यावर आम्ही लक्ष देणार अशी ग्वाही प्रदीप देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली.