तब्बल 426 झोपडपट्ट्यांमधील रहिवासियांना त्यांचे हक्काचे घर
प्रत्येकाला घरे देण्यासाठी शासन कटिबध्द:देवेंद्र फडणवीस यांनी मालकी हक्काचे पट्टेसाठी एका तपापूर्वी काढला होता एनआयटीवर मोर्चा

नागपूर अनेक वर्षांपासून नागपूर महानगरात वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी धारकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, स्वत:च्या मालकी हक्काचा पट्टा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला भाडे पट्टा देण्याच्या लोककल्याणकारी निर्णय आता एक आदर्श मापदंड म्हणून नावारुपास आला आहे. नागपूर येथील तब्बल 426 झोपडपट्ट्यांमधील रहिवासियांना त्यांच्या हक्काचे घर प्रत्यक्ष साकारले गेले आहे. या 426 झोपडपट्टीमधील एक असलेल्या लक्ष्मीनगर येथील झोपडपट्टीने आता जुन्या पाऊलखुणा पुसत श्रमीक नगर म्हणून आपल्या झोपडपट्टीचे नामकरण केले आहे.
या निर्णयाच्या माध्यमातून झोपडपट्टी मधील जे अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या प्रवर्गात आहेत त्यांना रमाई आवास योजनेत, याचबरोबर आदिवासी प्रवर्गात असलेल्या व्यक्तींना शबरी आवास योजनेत व इतर प्रवर्गातील व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळाली आहेत. एकही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन कटिबध्द आहे.