वाह रे आरोपी; चक्क चप्पल कापून लपवला गांजा
सेंट्रल जेल मधील धक्कदायक प्रकार ;चप्पल मधून २०१ ग्राम गांजा जप्त

नागपूर मध्यवर्ती कारागृह तेथील आरोपी नेहमी चर्चेचा विषय असतात. आणि आता या आधुनिक युगात आरोपींची युक्ती देखील आधुनि होताना दिसत आहे. काही दिवसा पूर्वी व्हायरल झालेला बार मधील चोरीचा विडिओ चर्चेत असताना आता मध्यवर्ती कारागृहात चक्क कोर्टात चप्पल बदलून बदलेल्या चप्पल मध्ये गांजा सापडल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सेंट्रल जेल मध्ये असलेला आरोपी त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सोनू उर्फ सर्फराज जहागीर आलम असं आरोपीच नाव आहे, त्याला ट्रायल साठी कोर्टात नेण्यात आलं दरम्यान अज्ञात आरोपींनी त्याची चप्पल बदलविली. कोर्टात चेकिंग करून नेण्यात आलं होत कोर्टातून जेल मध्ये नेताना सुद्धा आरोपीची चेकिंग करण्यात आली तेव्हा मात्र खळबळ जनक खुलासा झाला
कोर्टात जाताना आरोपीची चप्पल सॉफ्ट होती वापस येताना मात्र चप्पल हार्ड वाटली म्हणून पोलिसांनी चप्पल कापून बघितली तर त्यात चक्क २०१ ग्राम गांजा आढळलं आता हा गांजा कुठून,कसा,कोणी व कोणासाठी आणला याचा शोध धंतोली पोलीस करीत आहे