
नागपूर: भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस विदर्भासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मंगळवार आणि बुधवारी विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात ढगाळ वातावरण राहील. सकाळी काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.