
नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष आजपासून (२३ जून) सुरू झाले असले तरी पहिल्याच दिवशी अनेक शाळांमध्ये सामसूम पाहायला मिळाली. यामागचं कारण काही शिक्षक किंवा विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचं नव्हे, तर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने पुकारलेलं सरकारविरोधातलं एक दिवसीय आंदोलन आहे.
राज्यातील खासगी अनुदानित शाळांना सरकारकडून वेतन अनुदान वेळेवर मिळत नाही, तसेच आरटीई अंतर्गत शाळांना मिळणाऱ्या शेकडो कोटींच्या थकीत रकमेवरही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर महामंडळाने सरकारच्या विरोधात आवाज उठवत, आज एक दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.