महाराष्ट्र
विविध मेट्रो स्टेशनमध्ये योग दिवस साजरा

नागपूर : जागतिक योग दिनानिमित्य आज महा मेट्रोच्या वतीने लोकमान्य नगर,खापरी,झिरो माईल,छत्रपती चौक मेट्रो स्टेशन येथे योग दिवस साजरा करण्यात आला. उल्लेखनीय आहे की, झिरो माईल मेट्रो स्टेशन येथे एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मेट्रो कर्मचारी वर्ग सोबत सामूहिकपणे हा दिवस साजरा केला. यावेळी योग प्रशिक्षक यांनी विविध आसन शिकवत योगासनाचे महत्व पटवून दिले.
मेट्रोचा प्रवास आरोग्याच्या दिशने फायदेकारक असून नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा, असे आवाहन महा मेट्रोचे महा प्रबंधक श्री. सुधाकर उराडे यांनी लोकमान्य नगर येथे आयोजित कार्यक्रमात मेट्रो प्रवाश्यांना या दिवसाच्या निमित्ताने केले.