₹1 लाख कोटींचा विकास? की नागपूरकरांची फसवणूक? नागपूर पुन्हा जलमय! विकास ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
दरवर्षी तेच चित्र — घरात शिरलेलं पाणी, अंडरपास बंद, आणि नागपूरकरांचे आयुष्य विस्कळीत!

नागपूर – शहर पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे जलमय झालं असून नागरिकांचे सामान्य जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी घुसल्याने रहिवाशांचे हाल झाले आहेत, अंडरपास बंद झालेत आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
राज्य सरकारने नागपूरसाठी ₹1 लाख कोटी रुपयांच्या विकासकामांची घोषणा केली होती. मात्र नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचं कुठेही दिसून येत नाही. नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्था, आणि रस्त्यांची उंचसखल रचना यामधील अपयशामुळे दरवर्षी हेच चित्र पाहायला मिळतं आहे.
या पार्श्वभूमीवर नागपूर पश्चिमचे आमदार आणि काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी विधानसभेत भाजप सरकारच्या ‘खोट्या विकासनाट्या’वर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी पुढील स्पष्ट मागण्या मांडल्या:
🔹 नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन
🔹 मागील दोन वर्षांतील नुकसानीसाठी योग्य भरपाई
🔹 विकासकामांवर स्वतंत्र व निष्पक्ष लेखापरीक्षण
🔹 मनपा प्रशासनावर नियंत्रण व जबाबदारी निश्चित करणे