महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

आभा पांडे याचं निलंबन रद्द: राष्ट्रवादीचा यु – टर्न!

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात पुन्हा प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या मेळाव्यात तसे ठणकावून सांगितले होते. असे असतानाही राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आणि तत्कालीन प्रदेश सचिव आभा पांडे यांना आज पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या नावाला विरोध करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढलेल्या पत्रकात पूर्ण विचारांती आभा पांडे यांना पक्षात परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे

 

आभा पांडे यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. पांडे यांनी राष्ट्रवादी पक्षात असतानाच आपण कुठल्याही परिस्थिती निवडणूक लढणारच अशी घोषणा केली होती. आमदार कृष्णा खोपडे यांना पराभूत करणे हाच आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले होते.

 

मात्र कृष्णा खोपडे यांनी लाखांच्यावर मते घेऊन सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा विक्रम नागपूरमध्ये नोंदवला आहे. विशेष राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही त्यांनी पूर्व नागपूरवर दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचे टेंशन वाढवले होते.

 

दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. दुनेश्वर पेठे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबले तर आभा पांडे यांनी अजित दादांच्या गटात गेल्या होत्या. या दरम्यान त्यांना राज्य महिला आयोगाचे सदस्य करून दादांनी बळ दिले होते. त्यांच्या मतदारसंघासाठी काही कोटींचा निधीही दिला होता.

 

विशेष म्हणजे आभा पांडे यांनी चार सदस्यांचा प्रभाग असताना मागील महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवला होता. यापूर्वी त्या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. नागपूर महापालिका स्थायी समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button